2024 लोकसभा निवडणूक: राष्ट्रीय निवडणुकीसाठी शरदचंद्र पवार यांचा पक्ष ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या नावाने निवडणूक लढवेल
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार : माननीय शरद पवार यांच्या गटाला मिळालेले नवे नाव हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार हे नाव पार्टीला निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे.7 फेब्रुवारी 2024 रोजी, भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह प्रदान केले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) म्हणून ओळखला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार शरद चंद्र पवार यांच्या पार्टीमध्ये एकूण 13 आमदार 5खासदार आहेत.
राष्ट्रवादी पार्टी : राष्ट्रवादी पार्टी ही प्रामुख्याने भारतातील एक पक्ष आहे हा सामान्यता गांधीवादी धर्मनिरपेक्षतेचे समर्थन करतो. कधी पार्टी हा प्रामुख्याने तीन राज्यांमध्ये प्रमुख पक्ष म्हणून उभारला आहे. महाराष्ट्र नागालँड व केरळ या राज्यांमधील हा प्रमुख पक्ष आहे. 10 जून 1999 रोजी शरद पवार पीए संगमा आणि तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पार्टीची स्थापना केली होती. 1999 मध्ये सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात सर्वात मोठे यश मिळाले पहिल्यांदा निवडणुकीमध्ये राज्य विधानसभेसाठी ते 58 जागा जिंकून महाराष्ट्र राज्यात तिसऱ्या क्रमांकावरची पार्टी बनली व राज्यात आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस पक्षासोबत युती करत राष्ट्रवादी काँग्रेस ही महाराष्ट्रात सरकारमध्ये आली. राज्यामध्ये व राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष यांच्यामध्ये युती कायम राहिली व 2004 मध्ये काँग्रेसचे नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये राष्ट्रवादी पार्टी सहभागी झाली व माननीय मनमोहन सिंग हे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले.